ट्रस्टकडील निधी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी वापरला जातो. त्याचा कोणालाही वैयक्तिक लाभ घेता येऊ शकत नाही!
अविनाश पाटील यांनी केवळ वैयक्तिक आकसाच्या पोटी ‘हमीद–मुक्ता दाभोलकर गटाने अंनिस महाराष्ट्र ट्रस्ट ताब्यात घेतला’ अशा स्वरूपाचे जे जाहीर आरोप केले आहेत, ते धादान्त खोटे आहेत, हे या पत्राच्या माध्यमातून आम्ही जाहीर करू इच्छितो. हमीद आणि मुक्ता दाभोलकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी नाहीत. त्यांनी, तसेच एकाही ट्रस्टीने आजअखेर एकदाही एक नवा पैसादेखील मानधन किंवा प्रवासखर्च किंवा अन्य कारणाने घेतलेला नाही.......